शुक्रवार, २ जून, २०१७

kahi bolayache aahe.....1 {Be Positive----}



नमस्कार ,आज ह्या ब्लॉगचा पहिलाच दिवस. माझाही हा पहिलाच प्रयत्न.तो अशासाठी की अनेक वर्षे ज्युनिअर कॉलेजला व्याख्याता म्हणून काम केल्यावर आणि  विशेषतः समुपदेशनाचा अभ्यास केल्यावर या वयोगटातल्या मुलांसाठी काही करावेसे वाटू लागले. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की पालकांशी बोलणारे लेख खूप असतात.मुलांशी बोलणारे, त्यांच्याशी संवाद साधणारे लेख कमी असतात.त्यांच्याशी म्हणजे पौगंडावस्थेतील मुलांशी मराठीत बोलण्यासाठी हा प्रपंच. त्यांनी हे वाचावे अशी अपेक्षा आहे.त्यांचे माध्यम इंग्रजी असले तरी त्यांना मराठी भाषा वाचता येत असावी अशी माझी अपेक्षा आहे  पण आपण सुचवले तर इंग्रजीमधुनही लेख देत जाईन . आपण त्याना वाचावयास उद्युक्त करावे अशी माझी अपेक्षा आहे आपण लेख वाचून त्यातील काही गोष्टी त्याना समजावुन द्याव्यात व हळूहळू त्यांना वाचावयाची प्रेरणा द्यावी. केवळ अभ्यास नव्हे तर त्यांच्याशी संबधित विविध विषयांवर त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा आहे.
माझ्यादृष्टीने यात मी दोन भाग गृहीत धरले आहेत.पहिला पालकांसाठी प्रत्येक लेखाची पार्श्वभूमी पालकांसमोर मांडली जाईल.व त्या विषयासंदर्भात त्यांना काय करता येईल याची थोडी चर्चा असेल यात पालकांनी मुलांमधे व आपल्यात निर्भेळ नाते विकसित करण्याचा प्रयत्न न कंटाळता, आपले मुलांनी ऐकलेच पाहिजे असा अट्टाहास न करता,स्वतःही त्यांच्या पातळीवर येण्याच प्रयत्न करावा. आजचे पालकत्व पूर्वीच्या पालकत्वापेक्षा अधिक आव्हानात्मक आहे पण म्हणूनच आपल्याबाजूने अधिक सामंजस्याची व संयमाची जास्त गरज आहे आपण मोठे आहोत, या अवस्थेमधून गेलो आहोत म्हणून हे आपणच करायचे आहे. खरंतर आई बाबा व्हायचं ठरवल्यापासून मुलांना घडवणं ही जबाबदारी सुरु होते.तेव्हा सगळेच विचार, सगळेच प्रयत्न फार आधीपासूनच सुरु करावे लागतात, अगदी आपण मनात असलेला सगळा वेळ देऊ शकत नसलो, सगळ्याच मनातल्या कृती करू शकत नसलो तरीही. विशेषतः मुलं पौगंडावस्थेत आल्यावर थोडी आपल्यापासून तुटू लागल्यासारखी वाटतात तेव्हा आपलं काम आणखीनच कठीण होतं अशावेळी थोडे दिशादर्शक काम कसं करता येईल हे सुचवण्याचा प्रयत्न करणार आहे.
 दुसरा आणि महत्वाचा भाग मुलांसाठी .त्यांनी स्वतः काय करावं, न कंटाळता ,मनापासून ,निराशेने न थकता प्रयत्न करत राहावे याची चर्चा असेल त्यासाठी पालकांनी त्यांना प्रेरणा देत रहावे अशीही अपेक्षा आहे.कारण यश शेवटी त्यांचेच आहे व त्यांना ते सतत मिळत रहावे हि मनापासून इच्छा आहे.
थोडक्यात हे मुलांसाठी आहे .एका शिक्षकाला आणि पालकांना तनमनाने सुदृढ ,निर्णयक्षमता असणारी , परिपक्व, दुसऱ्यासाठी सह अनुभूती बाळगणारी, ताणातून सहज मुक्त होणारी ,यशस्वी होणारी,सुखात राहणारी मुलं हवी आहेत.त्यादिशेने हा छोटासा प्रयत्न.द्याल न साथ ?
पहिला लेख हा तुम्हा आम्हा सर्वांना एकमेकांशी बोलावेसे वाटण्यासाठी ,एकमेकांना मोकळेपणाने व्यक्त होण्याची सुरवात होण्यासाठी, आपण सर्व सकारात्मक पद्धतीने बोलण्यासाठी, सकारात्मक वातावरण निर्माण करू या.म्हणून पहिला विषय हाच की ‘सकारात्मकता’. Be Positive’.
आपल्या सूचना स्वागतार्ह .......
चला मनावरचे काळे ढग पळवू या ..... Develop success from failures. Discouragement & failures are two surest stepping stones to success!
हर्षिताचे भाषण अगदी रंगात आले होते.आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती व त्यासाठी शाळेत सर्वांसमोर तिची रिहर्सल चालू होती. विषय अगदी साधा ,सरळ आणि सोपा होता. ‘मी आणि माझे स्वप्न’.या स्पर्धेचे वैशिष्ठ्यचं होते की यातले विषय हे मुलांना स्वतः व्यक्त करायला लावणारे असे असत त्यामुळे मुले स्वतःच तयारी करू शकत.
बोलता बोलता तिचे लक्ष तिच्या आवडत्या जोशी बाईनकडे गेले. त्या तिच्याकडेच बघत होत्या. पण तेवढ्यात शेजारच्या काळे बाई काहीतरी बोलल्या आणि जोशीबाई हसल्या. हर्षिता एकदम गोंधळली. आपले काहीतरी चुकतंय की काय असा तिला वाटायला लागल.मनावर काळे ढग जमू लागले आणि भाषणातील अस्खलीतपणा कमी होऊ लागला.त्यात विस्कळीतपणा येऊ लागला.काय बोलतो आहोत तिचे तिलाच समजेना .घामाघूम होत कसातरी तिने तिचे भाषण संपविल.
अथर्व शाळेतला ‘सचिन’ म्हणून ओळखला जात असे.त्याच्या शाळेची मागच्या वर्षीच्या विनर टीम बरोबर फायनल चालू होती चौकार षटकार मारत अथर्व ९२ पर्यंत आला होता. शतक निश्चित होत.अथर्व खूप फॉर्ममध्ये होता.सगळीकडे ‘अथर्व,अथर्व’ चा पुकारा चालू होता अथर्वने खूप ताकदीने बॉल हीट करण्याचा प्रयत्न केला आणि तो पळू लागला .त्याच्या अपेक्षेइतका बॉल लांब नव्हता गेला. त्याने अंदाज घेतला आणि तो परत येण्यासाठी जोरात पळू लागला. त्याचं लक्ष स्टम्पकडे गेले ‘बापरे किती लांब आहेत हे मी नाही पोचू शकणार‘ असा मनात आलं आणि त्याचा स्पीड अचानक कमी झाला आणि ‘आउट’ एवढच त्याच्या कानावर आल आणि तो कोसळला.
असे ऐन वेळेला अचानक आपल्या मनावर काळे ढग जमू लागतात आणि आपल्या सर्व मेहनतीवर पाणी फिरवतात. हो न? ‘ते येऊच नयेत म्हणून काहीच नाही का करता येणार?’ ‘असं होत आमच पण नेहमीच’
ऐनवेळेला नाही काही करता येणार पण प्रयत्नपूर्वक मनाला सकारात्मक विचार करायची सवय लावता येईल हे मात्र नक्की.
‘हे असं आपल्याला आपल्या मनाला काय विचार करायचं ते सांगता येत?’  हो, नक्कीच येत. पण अचानक नाही, हळूहळू.विचार कसा केला जातो हे लक्षात घेतल्यावर, मनाला तसा करायला  शिकवल्यावर.
  सकारात्मक विचार करायचा म्हणजे काय करायचं? प्रथम आपण आपल्या मनाशी बोलायला शिकायचं. मनातल्या मनात, मनाशी बोलायचं.पण जे आपल्याला हव ते नाही तर जे आहे त्याचा व्यवस्थित विचार करायचा.
हे कस करायचं? तर प्रथम आपण आपल्या मनातील नकारात्मकता काढून टाकायला शिकायचं .ही नकारात्मकता आपल्याला उदास करते. आपल्यातल जे चांगल आहे ते विसरायला लावते. जे नाही,त्याचाच विचार करत रहाते.नकारात्मक विचाराच्या गर्तेत आपण गटांगळ्या खात राहतो आणि मग यश आपल्यापासून दूर पळू लागते.मन अस्वस्थ राहते ,मनाला मरगळ येते. सगळ्यातला आनंद उत्साह नाहीसा होतो. स्वतःबद्दल प्रेम तर सोडाच आपण आपल्याला आवडेनासे होतो, आपल्याला काहीच आवडेनासे होते.
हे सगळे कसं होत?आपण आपल्या विचारांची आपल्याही  नकळत अशी निवड करतो की आपल्यातला जे कमी आहे तेच आठवत रहात. आणि आपल्यातल काय चांगल आहे हे काही काळ आपण विसरूनच जातो.जे वाईट घडत आहे किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे  होत नाही त्याला आपण आपल्यालाच जबाबदार धरू लागतो.आपल्या आयुष्यात काही चांगल घडणारच नाही असही वाटू लागत.आणि मग मनाला येणारे नैराश्य काहींच्या बाबतीत जीवन संपविण्याच्या विचारापर्यंतही त्यांना पोचवितात.अशी ही नकारात्मकता नकोच आपल्याला.म्हणूनच आपल्या मनात असे काळे ढग जमू लागले की त्यांना लवकरात लवकर पळवून लावायला हव. हो न?
मनाला सकारात्मकता शिकवल्यावर गोष्टी याच्या अगदी उलट घडतात. काय काय होत?
Ø  आपल्याला आपली ध्येय साध्य करण्यासाठी उत्साह येतो.
Ø  अधिक ताकद मिळाल्यासारखे वाटू लागते .
Ø  आपला आपल्यावरचा आपल्या  क्षमतान्वरचा विश्वास वाढतो.आपलेही भविष्य  उज्वल होऊ शकेल असं वाटायला लागतं.
Ø  आपण आपल्यालाच काय पण इतरांनाही प्रेरणा देऊ शकतो.आपण स्वतःलाही व इतरांनाही आनंदी ठेऊ शकतो.त्यामुळे लोकांच्या मनात आपल्याला विशेष स्थान मिळते.
Ø  वाटेत येणाऱ्या रोजच्या छोट्या छोट्या अडथळ्यांवर सहजपणे आपण मत करू शकतो.
Ø  इतरांना आपले कौतुक वाटते व ते तसे  व्यक्तही करतात.
Ø  आपल्यालाही आपले आयुष्य मस्त आहे असा वाटू लागत.
Ø  आपण यशाचीच अपेक्षा करू लागतो.अपयशाची नाही.
Ø एखादे काम पूर्ण करण्याची जिद्द वाढीस लागते, मधेच काम अर्धवट सोडून द्यावेसे वाटत नाही. उलट नवनवीन आव्हाने स्वीकारावीशी वाटू लागतात.
Ø  एखाद्यावेळी अपयश मिळाले तरी ती संधी वाटू लागते. एखाद्या समस्येचा बाऊ न वाटता तुम्ही  त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधू लागता.व न कंटाळता नवेनवे प्रयोगही करू लागता.
Ø  या सर्व बदलांमुळे आपला आत्मसम्मान व आत्मविश्वास वाढीस लागतो.
आपण सकारात्मक विचार करू लागलो की आपल्या आरोग्यावरही त्याचा चांगला परिणाम होतो.तुम्हाला माहित आहेच की बऱ्याचवेळेला आपल्या आजाराच कारण हे शारीरिक नसून मानसिक असते कारण आपल्यातील नकारात्मकता आपल्या मनावर अधिपत्य गाजवीत असते.आपल्या मनावर येणारा ताण व त्यातून येणारे नैराश्य आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्यही घालविते.


सकारात्मक विचार करण्याच्या सवयींमुळे,
  • ·         आपल्या आजाराचे मूळ मानसिक कारणच निर्माणच होऊ देत नाही व त्यामुळे निर्माण होणाऱ्या आजाराची शक्यताच नाहीशी होते .
  • ·         नकारात्मक विचार नसल्यामुळे ,त्यामुळे येणारा ताण,नैराश्य यांना थाराच मिळत नाही.
  • ·         कष्टाच्या व ताणाच्या  काळातून निभावण्याचे कौशल्य प्राप्त होते.
  • ·         आपली शारीरिक प्रतिकार क्षमताहि वाढीस लागते
  • ·         आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारते.
  • ·         वाईट गोष्टीच्या दुष्परिणामांची तीव्रता जाणवल्यामुळे वाईट सवयींपासून लांब रहाणे शक्य होते.

आता सकारात्मक विच्राराचे महत्व पटले पण तो करायचा तरी कसा? ह्यासाठी --
ü  नकारात्मक  विचारांना मनात थाराच द्यायचा नाही. तसे विचार आले तरी पळवून लावायचे.
ü  कुठल्याही गोष्टीतील चांगली बाजू बघायची. एखाद्या प्रश्नाचे उत्तर नाही आले तरी बाकी आलेल्या प्रश्नांचा विचार करायचा आणि पुढचे येतील असा विचार करून पुढे जायचं.आपल्याला काय नाही मिळालं यापेक्षा काय मिळालं याचा विचार करायचा.झालेले नुकसान कमीच आहे यापेक्षा जास्त नाही झालं हे तरी बर झाल असं म्हणायचं.
ü  नेहमी आशावादी राहायचं.अपयश ही एक संधी असते, आपल्याला अधिक चांगलं घडविण्यासाठी.
ü  सर्वंकष विचार करायची मनाला सवय लावायची.कोणताही किंतु ,परंतु मनात ठेवायचा नाही.आणि जास्तीत जास्त चांगल्या आणि वास्तव पर्यायाची निवड करायची मनात यशाची खात्री बाळगूनच.
ü  आपल्याला सतत हसतमुख ,आनंदी कसा रहाता येईल याचे मार्ग शोधायचे.
ü  शक्य असेल तर गाणे म्हणा, आनंददायी गाणी ऐका, आवडता सिनेमा, नाटक,पुस्तक हेही आपला मूड चांगला करतात.
ü  आयुष्यात घडलेल्या एखाद्या प्रेरणादायी प्रसंगाची आठवणही आपल्याला खुलवते.
ü  स्वतःवर विश्वास ठेवा.प्रेरणादायी गोष्टी वाचा.प्रेरणादायी बोधवाक्ये कायम समोर ठेवा.
उदा. ‘I can do it & I will do it.’, ‘I am the best & today is my day’. ‘When the God is with me who can be against me?’ etc.-
ü आनंदी लोकांच्या सहवासात रहा.
ü आपल्याला जे व्हायला हवं आहे ह्याचा विचार करा.
ü स्वतःला प्रेरणा देणारी वाक्ये म्हणत रहा.
ü स्वतःचे विचार नियंत्रित करण्याचे प्रयत्न करत राहा.
 हे सर्व एका दिवसात होत नाही.यासाठी प्रयत्नांमध्ये सातत्य हवं.आपली संपूर्ण वृत्तीच सकारात्मक व्हायला हवी.
आपली सकारात्मक वृत्ती आपल्या सर्जनशील विच्रारातून,आशावादातून ,आपली ध्येयपूर्तीसाठी आपल्यातील सतत जागृत ठेवलेली स्वयंप्रेरणा ,आपली आनंदी रहाण्याची वृत्ती,यांनी व्यक्त होत असते. दररोजच्या प्रसंगांकडे असं  पहा.
स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा.त्रयस्थाच्या  भूमिकेतून स्वतःकडे पहा.आपल्यातले काही दोष असतील तर ते शोधा.त्यातला एकेकाचा विचार करून तो दूर कसा करता येईल असा विचार करून त्यादृष्टीने प्रयत्न करा.पण त्याचवेळेला आपल्यात खूप चांगल्या गोष्टीही आहेत   ह्याचा विसर पडू देऊ नका.
आपले विचार अधून मधून तपासून पाहत चला.ते नकारात्मक होत असतील तर ते जाणीवपूर्वक सकारात्मक कसे करता येतील याचा विचार करा.
आनंदी राहायचा प्रयत्न करा.तुमचे स्मित ,तुमचे खळखळून हसणे तुम्हाला छान उर्जा देईल.
 ‘Smiling Face is the most beautiful face.
विनोदी कार्यक्रम पहाणे,जोक्स सांगणे ऐकणेही उत्तम.पण ते उच्च दर्जाचे हवेत.
मनावरचे ताण कसे दूर होतील ते पहा.
स्वतःशी सतत संवाद साधा,व तोही सकारात्मक.स्वतःला सतत उर्जा कशी देता येईल ते पहा.स्वतःच स्वतःचे परिक्षण करा.चुकलं  असेल तरी ते सुधारता येत हे लक्षात ठेवा.स्वतः स्वतःला सतत प्रेरणा  देत रहा. उदा. ‘मला नाही जमणार ,मी नाही केलेले असे कधी’,असे म्हणता खरच  ती गोष्ट चांगली असेल तर मी नक्की करेन,एक संधी मी नक्की घेईन असे म्हणा आणि त्यादृष्टीने प्रयत्न करा.
मला वेळ नाही अशी लंगडी सबब कधीच सांगू नका.मी प्रयत्न करेन,विचार करेन आणि मला माझ्या प्राधान्यक्रमानुसार कसं जमवता येईल ते मी नक्की करेन.असं म्हणा आणि त्यानुसार खरच करा.
कोणत्याच बाबतीत नकारार्थी दृष्टीकोन ठेऊ नका.नुकसान आपलेच आहे हे लक्षात ठेवा व ते टाळायचे असेल तर आता लगेच निश्चय करा.’मी मला योग्य प्रकारे योग्य पद्धतीनेच कधी न कंटाळता, कधीही हार न मानता मला घडवण्याचा प्रयत्न करेन.कारण आयुष्यात मार्क देणाऱ्या परिक्षेपेक्षाहि  अधिक महत्वाच्या परिक्षा येत राहणार आणि त्या तुम्ही उत्तम रीतीने पारही करणार.कारण You are the Best!’  हो न  ?
‘Take up an idea. Make that idea your life-think of it, live on that idea. Let the brain .muscles, nerves, every part of your body, be full of that idea, & just leave every other idea alone. This is a way to success.’ – Swami Vivekanand.
  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा